ऐश्वर्या रायचे असे काही दुर्मिळ फोटो पाहिले आहेत का? जे क्वचितच समोर आले आहेत...
बॉलिवूडची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत असते.
तिच्या लहानपणापासून मिस वर्ल्ड होण्यापर्यंत आणि ग्लॅमरस पार्टींपर्यंतचे फोटो पाहून वाटेल – खरंच, तिच्यासारखी तीच!
१९९४ साली ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत, अप्रतिम सौंदर्य, बुद्धिमत्ता यांच्या जोरावर मिस वर्ल्डचा किताब पटकावला.
ऐश्वर्याने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात तामिळ चित्रपट 'इरुवर' आणि हिंदी 'और प्यार हो गया' या चित्रपटांमधून केली.
त्यानंतर ऐश्वर्याने आपल्या करिअरमध्ये, हम दिल दे चुके सनम, जोधा अकबर, देवदास, गुरु यांसारखे हिट चित्रपट दिले.
ऐश्वर्याच्या जुन्या फोटोंमधून तिच्या सौंदर्याचा आणि व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू उलगडतो.
ऐश्वर्याने नुसतेच बॉलिवूड नाही तर हॉलिवूड मधील ब्राइड अँड प्रेजुडिस, पिंक पँथर यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
ऐश्वर्याने २००७ साली अभिषेक बच्चन सोबत लग्न करून मुलगी आराध्याला जन्म दिला.
ऐश्वर्या राय हिला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं आहे तसेच ती पद्मश्री पुरस्काराची मानकरी देखील आहे.
ऐश्वर्या अभिनयासोबतच युनिसेफ सारख्या संस्थांसोबत वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कार्य देखील करते.