अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात झाला. त्याची कारणे ब्लॅक बॉक्समधून समोर येतील. शोध पथकांना १३ जून रोजी हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. आता त्याचा तपास सुरू होईल.
ब्लॅक बॉक्समधील दोन भाग तपासात महत्त्वाचे असतात. एक म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR). यामध्ये विमानाची वेग, उंची, गती, इंजिनची कामगिरी याची नोंद केली जाते.
दुसरा असतो कोकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR). यामध्ये पायलटांच्या संवादांचा, विमानातील आवाजांचा आणि नियंत्रण कक्षातील संवादांचा रेकॉर्ड असतो.
ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर तो सुरक्षित ठिकाणी नेला जातो. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्यासाठी विशेष उपकरण वापरतात. FDR आणि CVR मधील डेटा एक्सपोर्ट केला जातो.
ब्लॅक बॉक्सची अनेकांकडून तपासणी केली जाते. अपघाताचा तपास करणारे अधिकारी, अभियंते आणि विमानतळ सुरक्षा तज्ज्ञ हे ही बॉक्समधून माहिती मिळवतात आणि तपासतात.
FDR मधून टेक्निकल डेटा पाहतात जसे की विमानाचा वेग, उंची, इंजिनची स्थिती. CVR मधून पायलटमधील संभाषणाचा तपास करतात, जेणेकरून अपघाताच्या कारणाचा अंदाज येऊ शकतो.
संपूर्ण माहितीचा अभ्यास करून अपघाताचे कारण शोधून नोंदवले जाते. त्यासंदर्भातील रिपोर्ट सरकार आणि संबंधित यंत्रणांना दिला जातो. जेणेकरून असे अपघात टाळता येतील.