जाणून घ्या, उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय होतं?
कलिंगड हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र ते खाल्ल्यावर पाणी प्यावं की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.
कलिंगडमध्ये ९५ टक्के पाणी असतं, जे शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत करतं.
कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास पोटासंबंधीत त्रास वाढू शकतात.
आपल्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अस्वस्थ वाटू शकतं.
अपचन, एसिडिटी असा त्रास असणाऱ्या लोकांनी कलिंगड खाल्ल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी प्यावं.
उन्हाळ्यात कलिंगड हमखास खाल्लं पाहिजे कारण यामध्ये व्हिटॅमिन A, C, B6 आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात.