कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरीनेही हजेरी लावली असून तिचे लाल साडीतले हॉट फोटो सध्या जबरदस्त व्हायरल होत आहेत.
शाहरुख खान, कियारा अडवानी, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर यांच्या पाठोपाठ अदितीही कान्समध्ये दिसून आली.
ऐश्वर्या रायनेही कान्सच्या रेड कार्पेटवर बनारसी साडी आणि सिंदूर असा लूक केला होता. तसाच मोठा सिंदूर अदितीनेही भरला होता.
पण हा लूक अदितीने कान्सच्या रेड कार्पेटसाठी केलेला नव्हता. तिथल्या बीचवर अदिती या लूकमध्ये दिसून आली.
‘Sindoor is enhancing your beauty.’ अशा कमेंट तिला आल्या असून तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडून गेला आहे..
कपाळावर मोठी टिकली, ठसठशीत कानातले आणि गळ्यात चोकर अशा दागिन्यांमध्ये दिसणारी अदिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. .