आई झाल्यानंतरही लगेच कमबॅक करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री...
प्रेग्नन्सीनंतर सुट्टी घेण्याऐवजी, अवघ्या काही दिवसांतच पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कोण ते पाहा...
प्रेग्नन्सीनंतर अवघ्या काही दिवसांतच सेटवर परतल्या 'या' बॉलीवूड अभिनेत्री...
आलिया भट्टने लेक राहाच्या जन्मानंतर अवघ्या १५ दिवसांत कामाला सुरुवात केली होती. तिच्या या 'क्विक कमबॅक'ची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती.
करीना कपूरने तैमूर आणि जेह या दोन्ही मुलांच्या वेळी प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत काम केले आणि डिलिव्हरीनंतर अवघ्या महिन्याभरात ती सेटवर परतली होती.
अनुष्काने वामिकाच्या जन्मानंतर खूप लवकर कमर्शिअल जाहिरातींच्या शूटिंगला सुरुवात केली होती.
नेहा धुपियाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर अवघ्या ८ ते १० दिवसांत शूटिंग सुरू केले होते.
कॉमेडी क्वीन भारती सिंगने डिलिव्हरीनंतर अवघ्या १२ दिवसांत 'हुनरबाज' शोच्या सेटवर हजेरी लावली होती.
धुरंधर फेम सौम्या टंडनने जानेवारी २०१९ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर अवघ्या ४ महिन्यांत ती पुन्हा कामावर रुजू झाली होती.