IAS अधिकारी व्हायचं होतं, पण झाली अभिनेत्री, ओळखलं?



राशी खन्ना ही सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

निखळ सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर राशीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

राशीने तिच्या करिअरमध्ये हिंदीसह तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

राशी खन्नाचा जन्म आणि बालपण दिल्लीमध्ये गेलं. राशीचं शालेय आणि उच्च शिक्षणही दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे. 

अभ्यासात चांगली असल्याने आपण आयएएस अधिकारी व्हावं अशी तिची इच्छा होती. 

त्यानंतर जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर ती अभिनयाकडे वळाली. 

'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

त्याचबरोबर 'बंगाल टायगर', 'सुप्रीम' आणि 'जय लवा कुसा' यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.

Click Here