प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे सतत चर्चेत असणारं नाव आहे.
जिया शंकर ही मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली.जियाने 'वेड' चित्रपटाआधी काही लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून जिया तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जियाच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
समुद्रकिनारी अभिनेत्रीने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंनी फॅन्सच्या काळजाचा ठाव घेतलाय.
अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.