Low BP मुळे अभिनेत्री शेफालीचा मृत्यू?; या ४ गोष्टींची काळजी घ्या

इतक्या लहान वयात शेफालीच्या अचानक मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे

अलीकडेच अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले. तिच्या मृत्यूमागे आतापर्यंत हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितले जात होते

परंतु आता जे कारण पुढे येतेय त्यात रक्तदाब कमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची शंका आहे. अद्याप पोस्टमोर्टम रिपोर्टची पोलीस प्रतिक्षा करत आहेत

२०२० च्या नॅशनल फॅमिली सर्व्हेनुसार, १५ ते ४९ वयोगातील १८.६९ टक्के महिलांना रक्तदाबाचा त्रास आहे. जे हृदयविकाराचे मुख्य कारण बनू शकते

केवळ भारतातच नाही तर जगात महिलांमध्ये हा आजार वेगाने वाढत आहे. यातील महिलांच्या मृत्यूचा धोका ब्रेस्ट कॅन्सरच्या १० पट अधिक आहे

महिलांनी वेळोवेळी रक्तदाब, शुगर आणि कोलेस्ट्रॉल तपासला पाहिजे. जीवनशैलीत बदल, योग्य खाणे-पिणे आणि नियमित तपासणी यामुळे या आजारापासून बचाव होऊ शकतो

हा आजार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या व्यक्तीला कमकुवत करत असतो. तणाव आणि सततची चिंता यामुळे चक्कर येण्यासारखे प्रकार वाढू शकतात

महिला बऱ्याचदा या समस्यांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजार गंभीर होत जातो, त्यामुळे योग्य तपासणी, उपचार आणि सपोर्ट सिस्टम तयार करणे गरजेचे असते

Click Here