घरात कामधेनू कुठे ठेवावी?

कामधेनू अर्थात इच्छापूर्ती करणारी गोमाता. तिची मूर्ती अथवा प्रतिमा घरात ठेवल्याने वास्तूची भरभराट होते असे म्हणतात, यासाठी जाणून घ्या योग्य दिशा!

वास्तु शास्त्रानुसार घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो.

घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम (नैऋत्य) दिशेला लावा. लवकरच फायदा होईल.

घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदी राहते. 

वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात लक्ष्मी वास करू लागते. 

उत्तर-पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. 

घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते.

पश्चिम कोनात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते. व्यक्तीचे उत्पन्न वाढते. आध्यात्मिक वातावरण तयार होते. 

घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील तर कामधेनू गाईचे चित्र ईशान्य कोपर्‍यात लावावे आणि नंतर नियमित प्रार्थना करावी.

घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता कायम ठेवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र लावावे.

त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. लवकरच फायदा होईल.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि वास्तुशास्त्राच्या मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

Click Here