संकष्टीला आणा गजमूर्तीची जोडी!

अनेक श्रीमंतांच्या घरात तुम्ही गजमूर्तीची जोडी पाहिली असेल, हे केवळ शोपीस नाही तर हे धन, वैभव, समृद्धी आणणारे प्रभावी माध्यम आहे. 

फेंगशुईनुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवल्याने आयुष्य सकारात्मक वळण घेऊ लागते आणि अनेक चांगल्या घटना आयुष्यात घडू लागतात.

गजमूर्तीची जोडीही त्यापैकीच एक! फेंगशुई असो वा वास्तुशास्त्र, त्यात हत्ती हा वैभवाचे प्रतीक मानला गेला आहे. 

आज १४ जुलै रोजी संकटहरण चतुर्थी आहे, त्यानिमित्त ही गजमूर्तीची जोडी घरात आणण्याचे फायदे जाणून घ्या आणि आजच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा. 

शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. 

ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घरावर गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. 

आताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची पितळ्याची, चांदीची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येईल. 

त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल. 

जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल हत्तीच्या दोन मूर्ती आणा. दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा.

लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका. हा रंग शोक आणि दु:खाचे प्रतीक आहे, त्याऐवजी पांढरी स्फटिकाची मूर्ती आणा. 

पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती आणा, मात्र काळा हत्ती आणू नका. 

हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. 

Click Here