मोबाइलमुळे होतोय मेमरी लॉस

सतत माेबाईलचा वापर केल्याने, फक्त डाेळ्यांना त्रास हाेताे असे नाही. संपूर्ण शरीरावर, मेंदूवर मोबाईल वापरण्याचा परिणाम हाेत असताे. 

माेबाईलवर येणाऱ्या नाेटिफिकेशन्स, लाईक्स, मेसेजमुळे मेंदूतून फिल गुड देणारे डाेपामिन हे केमिकल स्त्रवते. मेंदूला त्याचे व्यसन लागते. 

सतत स्क्राेलिंग, रिल्स बघितले, तर ब्रेनला सतत नवीन गाेष्टी, झटकन मिळणाऱ्या माहितीची सवय लागते. याचा परिणाम एकाग्रता कमी हाेते. 

स्क्रीनचा निळा प्रकाश (blue light) मेलाटोनिन हार्मोन कमी करतो. परिणामी झोप उशिरा लागते आणि मेंदू थकतो.

जास्त स्क्रीन टाईम मुळे सामाजिक तुलना, FOMO (Fear of Missing Out) आणि चिंता वाढते. विनाकारण तणाव वाढताे. 

सातत्याने माेबाईलवर सहज उपलब्ध हाेणाऱ्या माहितीमुळे मेंदूची स्मरणशक्ती कमी हाेतेय. मेंदू लक्षात ठेवणे क्रिया कमी करताे. 

माेबाईलचा सतत वापर केल्याने मेंदूला शांत वेळ मिळत नाही. मेंदू सतत उत्तेजित राहताे. यामुळे कल्पकता कमी हाेते. 

माेबाईल वापरण्याची वेळ ठरवून घ्या. रात्री झाेपण्याआधी १ तास माेबाईल लांब ठेवा.

वाचन करणे, चालणे, मित्रांशी प्रत्यक्ष संवाद साधणे या गाेष्टींना प्राधान्य द्या, वेळ द्या. जीवनशैली सुधारा. 

आठवड्यातून एकदा डिजीटल डिटाॅक्स करा. यामुळे मेंदूला रीसेट हाेण्यास मदत हाेईल, मेंदूची कार्यक्षमता वाढेल.

Click Here