IPL 2026 : अभिषेक ते वैभव सूर्यवंशी! पॉवर प्लेमधील ५ 'सिक्सर किंग्स' 

कोणी दाखवली पॉवर?

IPL २०२६ च्या हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटर्सच्या यादीत वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्यात तगडी फाईट आहे. 

 वैभव सूर्यवंशीनं ६ सामन्यात २० षटकार मारले असून पॉवर प्लेमध्ये त्याच्या बॅटमधून १५ षटकार पाहायला मिळाले आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मानं ६ सामन्यात १७ षटकार मारले असून यातील १५ षटकार हे पॉवर प्लेमध्ये आले आहेत. 

पंजाब किंग्सचा बॅटर प्रियांश आर्य याने ६ सामन्यातील २० पैकी १५ षटकार हे पॉवर प्लेमध्ये मारले आहेत. 

यशस्वी जैस्वाल याने ६ सामन्यात १२ पैकी ९ षटकार हे पॉवर प्लेमध्ये मारले आहेत. 

मुंबई इंडियन्सच्या रायन रिकल्टन याने ५ सामन्यात १२ षटकार मारले असून यातील ९ षटकार त्याने पॉवर प्लेमध्ये मारले आहेत.

Click Here