...अन् अभिषेक शर्मानं मोडला MS धोनीचा विक्रम 

टी-२० त सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय!

अभिषेक शर्मानं टी-२० कारिकिर्दीतील नववे आणि आयपीएलमधील दुसरे शतक झळकावताना ३५० षटकारांचा पल्लाही पार केला.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात १० षटकार मारत अभिषेक शर्मानं  MS धोनीचा मोठा विक्रम मोडीत काढला.

टी-२० क्रिकेटमध्ये आता अभिषेक शर्माच्या खात्यात ३५१ षटकरांची नोद झाली आहे.

MS धोनीनं आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत ३५० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मा ५५५ षटकारांसह अव्वलस्थानी आहे.

विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर असून आतापर्यंत टी- २० कारकिर्दीत त्याच्या बॅटमधून ४४३ षटकार पाहायला मिळाले आहेत.

सूर्यकूमार यादवने आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत ४२३ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

संजू सॅमसन हा देखील आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत आहे. त्याच्या खात्यात ४०५ षटकारांची नोंद आहे. 

Click Here