या सुंदरीनं इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या मनातील भावना
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माची बहिण कोमल शर्मा ही देखील IPL दरम्यान चर्चेत राहणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक आहे.
पेशाने डॉक्टर असणारी कोमल आयपीएल दरम्यान आपला भाऊ अभिषेकला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावतानाही पाहायला मिळते
ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून सध्या तिची एक खास पोस्ट चर्चेत आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यावेळी तिने हार्दिक पांड्यासह अन्य काही फोटो शेअर केले आहेत.
इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करताना तिने रोहित शर्माला भेटायला मिळाले नाही, याची खंतही व्यक्त केल्याचे दिसून येते.
यावेळी रोहित सरांना भेटू शकले नाही, पण लवकरच त्यांना भेटायची संधी मिळेल, असा विश्वासही तिने व्यक्त केलाय.
अभिषेक शर्मा हा आपल्या बहिणीला लकी चार्म मानतो. कोमलही सातत्याने आपल्या भावावरील प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळते.