या यादीत नेहराचंही नाव...
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मावर सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली.
टी-वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणात अशी नामुष्की ओढावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
सलामीवीराच्या रुपात यावर्षी अभिषेक शर्मा पाचव्यांदा शून्यावर बाद झाला. त्यात वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावे लाजिरवाण्या हॅटट्रिकची नोंद झाली.
याआधी भारताच्या आशिष नेहरा २०१०-२०१६ या कालावधीत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता.
२००९ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या आंद्रे प्लेंचरवर सलग तीन सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती.
गत हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युगांडाचा रोजर मुकासा हा सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता.
टी-२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडरमध्ये सर्वाधिक ६ वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या सईम अयूबच्या नावे आहे.
अभिषेक शर्मा थायलंडचा शेलोमवांग, नेपाळचा कुशल बुर्तेल, इंडोनेशियाचा धर्मा केुमा आणि बंगालादेशचा परवेज हुसैनसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहे.