करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करण हा बॉलिवूडमधील गॉसिपसाठी प्रसिद्ध आहे. यामधील अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन यांची एक जुनी क्लिप व्हायरल होत आहे.
करण जोहरने यामध्ये अभिषेक बच्चनला विचारलं की, "तू तुझी पत्नी की आई... कोणाला जास्त घाबरतोस?"
अभिषेकने याचं 'माझी आई' असं उत्तर दिलं. तेव्हा बहीण श्वेताने त्याला थांबवलं आणि 'बायको' असं म्हणत भावाची पोलखोल केली.
अभिषेक यावर रागाने उत्तर म्हणतो की, "हा माझा रॅपिड फायर आहे, तू गप्प राहा."
"आईबद्दल बोलण्यापूर्वी विचार करत नाही, पण पत्नीबद्दल सर्व काही काळजीपूर्वक विचार करून बोलतो" असंही श्वेताने अभिषेकबद्दल म्हटलं आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं २००७ मध्ये लग्न झालं. त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे.