अभिषेक बच्चनने २००० साली 'रिफ्यूजी'मधून डेब्यू केला होता. यामध्ये अभिनेत्री करीना कपूरही होती.
चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अभिषेकने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला.
"मी आणि बेबो एका प्रोजेक्टर रुममध्ये बंद झालो होतो" असं सांगितलं आहे.
"चित्रपटाच्या प्रीमियरआधी मली मनालीला जायचं होतं पण खराब वातावरणामुळे फ्लाईट कॅन्सल झालं. मी बेबोला कॉल केला आणि थिएटरला जाऊ असं म्हटलं."
"मी आणि बेबो गेटी गॅलेक्सी आणि चंदन सिनेमा येथे गेलो. आम्ही प्रोजेक्टर रुममध्ये बंद झालो कारण प्रेक्षकांना आम्ही आत असल्याचं समजलं होतं" असं अभिषेकने सांगितलं.
करीना कपूर आणि अभिषेक बच्चनच्या या चित्रपटात एक इंटीमेट सीन देखील होता. त्या दरम्यान करीनामुळे अभिषेक नाराज झाला होता.
करीनाने त्यावेळी अभिषेकचा मूड खराब केला होता. या दोघांनी 'मैं प्रेम की दीवानी हूं' या चित्रपटातही एकत्र काम केलं आहे.