परदेशात गुपचूप केलं लग्न, नवरा आहे हँडसम
अभिनेत्री डान्सर लॉरेन गॉटलिबने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकतीच ती बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकली
टोबियास जोन्स असं तिच्या नवऱ्याचं नावं आहे. तो लंडन बेस्ड व्हिडिओ क्रिएटर आणि डायरेक्टर आहे
लॉरेनने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. व्हाईट गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
इटलीतील टकसनीत त्यांचं ड्रीम वेडिंग पार पडलं. यामध्ये मोजकेच नातेवाईक आणि मित्रपरिवार हजर होते.
एखाद्या स्वप्नवत वेडिंग प्रमाणेच या विवाहसोहळ्यातील डेकोरेशन केलेलं दिसत आहे.
लॉरेन आणि टोबियास यांनी गेल्या वर्षीच साखरपुडा केला होता
आता त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव आहे. लग्नाच्या या फोटोंमध्ये कपलच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद बघायला मिळत आहे