जाणून घ्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घराण्याची खास माहिती
'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा आपल्या अभिनय कौशल्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातील साधेपणामुळे देखील चर्चेत असतो.
संपूर्ण जगभरात आमिरचे असंख्य चाहते आहेत.
पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, आमिर खानचं मूळ गाव नेमकं कोणतं आहे?
मुंबईत जन्मलेला आमिर खानचं मुळ गाव हे उत्तर प्रदेशात आहे.
आमिर खानचे वडिलोपार्जित गाव उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शहाबादजवळील अख्तियारपूर आहे. ज्यामध्ये त्याचे आजोबा आणि पणजोबा राहिले.
आमिर खानचे वडील ताहिर हुसैन हे स्वतः एक चित्रपट निर्माता होते आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
जरी आमिर खानचा जन्म आणि संपूर्ण शिक्षण मुंबईत झालं असलं, तरी त्याच्या पूर्वजांचे मूळ गाव हे उत्तर भारतातले आहे.
आमिरने स्वतःही एका मुलाखतीत आपल्या गावाबद्दल बोलताना सांगितले होते की त्याला त्याच्या मूळच्या मातीशी नातं कायम जपायला आवडतं.