युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदीची अनेकदा तुलना केली जाते.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यांची अनेकदा तुलना केली जाते.
आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा, विकेट्स आणि शतकांच्या बाबतीत कोण पुढे आहे याची माहिती देत आहोत.
युवराजने ४० कसोटी सामन्यांमध्ये १९०० धावा आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत, तर आफ्रिदीने २७ कसोटी सामन्यांमध्ये १७१६ धावा आणि ४८ विकेट्स घेतल्या आहेत.
वनडेमध्ये युवराजने ३०४ सामन्यांमध्ये ८७०१ धावा आणि १११ विकेट्स घेतल्या आहेत, तर आफ्रिदीने ३९८ सामन्यांमध्ये ८०६४ धावा आणि ३९५ विकेट्स घेतल्या आहेत.
टी-२० सामन्यांमध्ये युवराजने ५८ सामन्यांमध्ये ११७७ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत, तर आफ्रिदीने ९९ टी-२० सामन्यांमध्ये १४१६ धावा आणि ९८ विकेट्स घेतल्या आहेत.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २५१ षटकार मारले आहेत, तर आफ्रिदीने ४७६ षटकार मारले आहेत.
युवराजने वनडेमध्ये ३ तर कसोटीमध्ये १४ शतके ठोकली आहेत. आफ्रिदीने कसोटीमध्ये ५ तर वनडेमध्ये ६ शतके लगावली आहेत.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ अर्धशतके मारली आहेत, तर आफ्रिदीने ५१ अर्धशतके मारली आहेत.
युवराजने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १,२४५ चौकार मारले आहेत, तर आफ्रिदीने १,०५२ चौकार मारले आहेत.
युवराज सिंगने एकदिवसीय सामन्यात एकदाच ५ बळी घेतले आहेत, तर आफ्रिदीने कसोटी सामन्यात एकदा हा पराक्रम केला आहे.