हे केरळ नाही! सांगली हाय सांगली, पावसाळ्यात भेट दिली पाहिजे

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी आपण ठिकाण शोधत असतो.

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात असलेल्या निसर्गरम्य गुढे पाचगणी पठाराचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढत आहे. 

सध्या दिवसेंदिवस येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी या परिसरात दूरवरून पर्यटक येत असून येथील वैविध्यपूर्ण दृश्यांचा आनंद लुटत आहेत.

शिराळा तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे गुढे पाचगणीचे पठार चांदोली अभयारण्यालगत आहे. या परिसरात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. 

विविध प्राणी पक्षांचा वावर, देखणे डोंगर, उताराची शेती, कडेकपारीतील धबधबे, पाणवठेमुळे गुढे पाचगणी पठार सर्वांनाच आकर्षित करीत आहे.

सध्या या पठारावर जागोजागी फुलोत्सव सुरू झाला आहे. कास पठाराप्रमाणेमुळे या ठिकाणी विविध जातीची बहुरंगी फुले नजरेस पडत आहेत. 

त्यामुळेच या परिसराला मिनी महाबळेश्वर संबोधले जात आहे. हे पठार उंचावर असल्याने येथून शिराळा पश्चिम भागातील निसर्ग चांदोली धरणासह अनुभवता येत आहे.

चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार, उदगिरी पठार ही सर्वच ठिकाणे पश्चिम भागात असून पर्यटकांना एकाच वेळी या ठिकाणांना भेटी देऊन आनंद घेता येत आहे.

सांगलीपासून ९४ किलोमीटर अंतरावर गुढे पाचगणी नावाचं पठार आहे. हे शिराळा तालुक्यात आहे.

कोल्हापूर पासून गुढे पाचगणीला जाण्यासाठी ८९ किलोमीटर अंतर  आहे. 

Click Here