भारतात 'इथे' करू शकता हॉट एअर बलूनची सफर!

हॉट एअर बलूनमध्ये बसून संपूर्ण शहर बघण्याचा अनुभव खूप खास असतो. 

साहसी लोकांसाठी हॉट एअर बलूनची सफर करणं म्हणजे पर्वणीच असते. 

भारतातही अशा अनेक जागा आहेत, जिथे हॉट एअर बलून राईडचा आनंद घेता येऊ शकतो. 

राजस्थानच्या जयपूरमध्ये हॉट एअर बलूनची राईड करता येते. तब्बल तासभर ही सफर करता येते. 

हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये फिरायला जात असला, तर तिथेही हॉट एअर बलूनची सफर करू शकता.

महाराष्ट्राच्या लोणावळ्यामध्ये हॉट एअर बलूनची राईड करण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. 

गोव्याचे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत आणि हॉट एअर बलूनमधून प्रवास करणे देखील प्रसिद्ध आहे

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या सुंदर शहरात हॉट एअर बलून राईडचा आनंद घेता येतो. 

आग्रा येथील ताजमहाल शहरात तुम्ही हॉट एअर बलूनमधून देखील प्रवास करू शकता. 

हॉट एअर बलून राईड्सचे दर ठिकाणांनुसार वेगवेगळे असू शकतात. यासाठी प्रति व्यक्ती सुमारे २ ते १० हजार रुपये खर्च येऊ शकतो.

Click Here