देशातील अनेक रेल्वे स्थानकांना मोठा इतिहास आहे.
फॉरेनला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, यासाठी विमानाचा प्रवास आणि जास्त खर्च असतो.a
काहींना वाटते किंवा तो सगळ्यांनाच परवडेल असा नाही. पण तुम्हालाल माहिती आहे का तुम्ही ट्रेननेही फॉरेनला जाऊ शकता.
भारतातील असं रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही मिनिटात दुसऱ्या देशात पोहोचाल. भारतातील हे एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे.
हे रेल्वे स्टेशन देशातील शेवटचं स्थानक मानलं जातं. हे स्टेशन तुमचा विमान प्रवासाचा खर्च देखील वाचवू शकतं.
इथून नेपाळ इतका जवळ आहे की तुम्ही पायी जाऊ शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारतीयांना नेपाळला जाण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टची आवश्यकता नाही.
आता हे रेल्वे स्टेशन कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे जोगबनी. हे बिहारमध्ये आहे.