बौद्ध भिख्खूंना अडकवणारी ती महिला कोण?

बौद्ध भिख्खूंसोबत शरीर संबंध ठेऊन जमावले १०० कोटी

बौद्ध भिक्षूंसोबत लैंगिक संबंध ठेवत पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या ३५ वर्षीय विलावन एम्सावतला थायलंड पोलिसांनी अटक केली.

सिका गोल्फ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम्सावतने बौद्ध भिख्खूंशी लैंगिक संबंध ठेवून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले.

या प्रकरणाची सुरुवात उच्चपदस्थ भिक्षू फ्रा थेप वाचिरापमोक बेपत्ता झाल्यानंतर झाली. एम्सावतने प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी दिल्यानंतर तो लाओसला पळून गेला.

मिस गोल्फने मे २०२४ मध्ये त्या फ्रा थेपशी संबंध निर्माण केले होते. नंतर तिने दावा केला की ती त्याच्या मुलाची आई आहे आणि त्याच्याकडून पोटगीची मागणी केली.

तीन वर्षांत सिका गोल्फने नऊ भिख्खूंशी संबंध ठेवले आणि त्यांना ब्लॅकमेल केले. गोल्फच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली असता  अनेक मंदिरांचा समावेश आढळून आला.

भिख्खूंना धमकावण्यासाठी ती ज्या घराचा वापर करत होती, तिथून ८०,००० हून अधिक फोटो आणि व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी गोल्फवर ब्लॅकमेल, मनी लाँडरिंग आणि चोरीची मालमत्ता मिळवणे यासह अनेक आरोप लावले आहेत. तिने काही पैसे ऑनलाइन जुगारावर खर्च केले.

Click Here