खुलताबादचं नाव रत्नापूर होणार...?

नेमका काय आहे या गावाचा इतिहास...? जाणून घ्या

खुलताबाद हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनग जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. या गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे.

या गावाला खुलताबाद हे नाव औरंगजेबाच्या मृत्यू नंतर देण्यात आले आहे. येथेच त्याची कबरही आहे.

मुगल बादशाह औरंगजेबाने या गावाला "खुल्द-मकान" अशी उपाधी दिली होती. याचा अर्थ "स्वर्गाचं ठिकाण". यावरूनच त्याच्या मृत्यूनंतर या गावाचे नाव 'खुलताबाद' असे करण्यात आले.

खुलताबादपूर्वी या गावाचे नाव 'रत्नापूर' होते, असे बोलले जाते. यामुळे आता खुलताबाद नाव बदलून याचे नाव पुन्हा 'रत्नापूर' करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

 १४ व्या शतकात येथे अनेक सूफी संत वास्तव्यास होते. यामुळे याला संतांची दरी/भूमी असेही म्हटले जात होते. 

या गावाला 'रौझा' असेही संबोधले जात होते. याचा अर्थ 'स्वर्गातील नंदनवन' असा होतो.

इस्लामी आक्रमणापूर्वी या ठिकाणाला भद्रावती नगरी म्हटले जात. येथे भद्रसेन नावाचा राजा होता. हा राजा श्रीरामभक्त होता. त्याच्या राम भक्तीमुळे येथे भद्रा मारुती आले आणि राहिले अशी कथा आहे.

खुलदाबाद येथील भद्रा मारूती संस्थान प्रसिद्ध आहे. येथे हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. येथे हजारो भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत असतात.

हे आहेत जगातील सर्वात विषारी ५ साप...!

Click Here