सांधेदुखी ते त्वचेच्या समस्या! नाभीत मोहरीचं तेल लावण्याचे फायदे

जाणून घ्या, मोहरीच्या तेलाचे भन्नाट फायदे

हिवाळा सुरु झाला की अनेक शारीरिक तक्रारी डोकं वर काढतात. यावरच एक चांगला उपाय म्हणजे मोहरीचं तेल.

मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. परंतु, ते योग्यप्रकारे कसं वापरायचं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

मोहरीचं तेल नाभीत टाकलं तर शरीरातील उष्णता टिकून राहते. त्यामुळे थंडी सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढते. तसंच शरीराचं तापमान संतुलित राहतं.

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. नाभीत मोहरीचं तेल घातल्याने शरीराच्या आतील स्तरातून पोषण मिळते. ओलावा वाढतो आणि त्वचा मऊ व चमकदार होते.

नाभीचा थेट संबंध आतड्यांशी असतो. त्यामुळे नाभीत तेल घातल्याने पचनक्रिया सुधारते. गॅस, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.

हिवाळ्यात सांधे दुखणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. मोहरीच्या तेलात नैसर्गिक सूज-प्रतिबंधक गुण असतात. नाभीतून हे गुण शरीरात जाऊन सांधेदुखी, सूज कमी करण्यात मदत करतात.

मोहरीच्या तेलातील जंतूनाशक गुण त्वचेवरील संसर्ग, खाज, रॅशेस यांसारख्या समस्यांपासून बचाव करतात.

हिवाळ्यात दररोज डाळिंब खा, तुम्हाला हे ७ फायदे मिळतील

Click Here