बाईकची मागची सीट उंच का आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेषत: त्यांना ज्यांना उंच सीट असल्याने बाईकवर मागे बसताना त्रास होतो. यामुळे बाईकवर चढणं, उतरणं कठीण होतं, अशी त्यांची तक्रार असते.
पण बाईक कंपन्या बाईकच्या मागील सीट उंच का करतात? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील खरं कारण तुम्हाला माहिती पडलं तर तुम्ही उंच सीटबाबत तक्रार कधीच करणार नाही.
आरामदायी प्रवासासाठी योग्य सीट अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच सीट डिझाइन करताना ती किती रुंदीची आणि किती उंच असावी याचा विचार केला जातो. बाईकची मागील सीट उंच असण्यामागेही बरीच कारणं आहेत.
बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये समान संतुलन राखणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी दोन्ही टायर्सचं वजन योग्य असले पाहिजे.
बाईकच्या संतुलनासाठी मध्यभागी वजन आवश्यक असतं. मागची सीट उंच केल्याने, मागे बसलेली व्यक्ती पुढे झुकते आणि तिचं वजन बाईकच्या मध्यभागी जास्त पडतं, ज्यामुळे संतुलन राखलं जातं.
तसंच मागची सीट उंच असल्याने आणि मागील व्यक्तीचं वजन मध्यभागी जास्त असल्याने बाईकवरील हवेचा दाबही कमी होतो आणि बाईक सुरळीत चालते.
मागील सीट उंच असण्याचं आणखी एक कारण म्हणजे मागे बसलेल्या व्यक्तीला पुढे बसलेल्या व्यक्तीमुळे संरक्षण मिळतं. धूळ, वारा आणि वायब्रेशन कमी जाणवतं.