महादेवी हत्तीसाठी कोल्हापुरकर एवढे भावनिक का झाले?
नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीसाठी कोल्हापूरकर भावनिक झाले आहेत.
नांदणी गाव, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटंसं गाव, जिथे गेल्या ४० वर्षांपासून एक हत्तीण ‘महादेवी’ उर्फ ‘माधुरी’ ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळवून होती.
नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या ७४८ गावांचा केंद्रबिंदू आहे.
याच मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे. महादेवी ही त्या परंपरेची जीवंत प्रतिनिधी होती.
३५ ते ४० वर्षांपासून ती मठात राहत होती. मठाचे मठाधिपती प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं.
तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली.
हत्तीला आता 'वनतारा' मध्ये पाठवण्याचे कोर्टाने आदेश दिले. यामुळे तिला वनतारामध्ये पाठवण्यात आले. पण, यामुळे कोल्हापूरकर भावनिक झाले आहेत. आंदोलने करुन महादेवीला परत देण्याची मागणी करत आहेत.
या हत्तीणीला निरोप देताना नांदणीसह परिसरातील लोक भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
महादेवी हत्तीला निरोप देतं असताना मठातील महास्वामींना अश्रू अनावर झाले, यावेळी महादेवी हत्तीच्याही डोळ्यातून पाणी आल्याचे पहायला मिळाले.
हत्ती परत देण्याची मागमी कोल्हापूकरांनी केली आहे, यासाठी आंदोलने सुरू केली आहेत. वनतारा प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे.