जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला विहिरीचा आकार हा गोलच असल्याचं दिसेल.
याला काही जुन्या प्राचीन काळातील विहिरी अपवाद देखील आहेत. ज्या चौकोनी आकारात बांधल्याचं दिसून येतं, मात्र याचं प्रमाण खूपच कमी आहे.
विहीर ही कधीच त्रिकोणी किंवा इतर आकाराची असत नाही ती गोलच असते. विहीर गोलच का असते?
गोल आकाराची कोणतीही वस्तू ही खूप मजबूत असते. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या बांधकामाची रचना ही गोल बनवता तेव्हा तिच्यावर पाण्याचा आणि मातीचा दबाव सर्व बाजुनं सारखा पडतो तो कुठेच कमी किंवा जास्त होत नाही.
त्यामुळे अशी वास्तू ही मजबूत बनते, दीर्घकाळ सुस्थितीत राहाते, ती ढासळण्याची शक्यता खूप कमी असते.
या उलट तुम्ही चौकोणी, त्रिकोणी इतर कोणत्याही आकाराची विहीर बनवाल तर त्यामध्ये धोका हा असतो की, पाणी आणि मातीचा दबाव हा एकाच बाजूवर अधिक पडण्याची शक्यता असते.
ज्यावेळी पाणी आणि मातीचा दबाव एकाच बाजूवर अधिक पडतो, तेव्हा तो भाग खचण्याची शक्यता अधिक असते.
तुम्ही जेव्हा विहीर खोदता तेव्हा विहिरीमध्ये पाणी आणि मातीचा दबाव सर्वाधिक असतो. तो सर्व बाजूनं सारखा पडावा असा प्रयत्न असतो, त्यामुळे जगात तुम्ही कुठेही जा विहीर तुम्हाला गोलच दिसेल.