आपला फोन जास्त वापरामुळे हँग होतो.
जर तुमचा फोन वारंवार हँग होत असेल तर तुम्ही केअर सेंटरमध्ये न जाता ही समस्या स्वतः सोडवू शकता.
अनावश्यक फाइल्स आणि अॅप्स काढून टाका, स्टोरेज वाचवण्यासाठी मोठ्या फाइल्स क्लाउडवर ट्रान्सफर करा.
गुगल प्ले स्टोअर वरून अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा, तुम्ही वापरत नसलेले जुने अॅप्स डिलीट करा.
सेटिंग्जमध्ये बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले सर्व अॅप्स बंद करा.
तुमचा फोन रिफ्रेश करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी रीस्टार्ट करा.
फोन सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट्स तपासून तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.