बेलापूरच्या नावात CBD का आहे? त्याचा अर्थ काय?

CBD हे शॉर्टफॉर्म आहे, पण त्याचा पूर्ण अर्थ अनेकांना माहिती नाही.

नवी मुंबईमधील सीबीडी बेलापूर हे रेल्वेस्थानक प्रसिद्ध आहे.

या ठिकाणाचं नाव फक्त बेलापूर आहे, पण नावात सीबीडी का वापरतात, त्याचा अर्थ काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. 

‘CBD’ ही संज्ञा आहे Central Business District. याचा अर्थ म्हणजे एक असं शहरी क्षेत्र जेथे प्रमुख व्यवसाय, कार्यालयं, सरकारी संस्था आणि व्यापारी केंद्र एकत्र असतात. 

एखाद्या शहराचा 'बिझनेस हब'. जसं मुंबईत BKC आहे, तसंच नवी मुंबईत CBD बेलापूर हे केंद्र मानलं जातं.

CIDCO नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या नोडस्‌ तयार केल्या. त्यामध्ये बेलापूर हे विशेषतः व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित केलं.

इथे अनेक सरकारी कार्यालयं, न्यायालयं, आयटी कंपन्या, बँकांचं मुख्यालयं आणि मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत.

CBD बेलापूर स्थानक हे हार्बर लाइनवरील महत्त्वाचं स्थानक आहे. रोज हजारो प्रवासी इथून प्रवास करतात.

Click Here