गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.
शहरीकरणामुळे जंगले कमी होत आहेत, ज्यामुळे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीच्या जवळ येतात.
जखमी बिबटे किंवा वाघ अधिक आक्रमक असतात आणि स्वतःच्या बचावासाठी हल्ला करतात.
जंगली प्राण्यांना माणसांची किंवा इतर धोक्यांची जाणीव झाल्यावर ते घाबरतात आणि आक्रमक होतात.
बिबटा किंवा वाघ माणसाला शिकार समजतो, विशेषतः जर तो गोंधळलेला असेल किंवा त्याला खाण्यासाठी काही सापडत नसेल.
मादी बिबटे किंवा वाघ आपल्या पिलांचे संरक्षण करताना अधिक आक्रमक होऊ शकतात.
अनेकदा हल्ले हे अपघाती असतात, हेतुपुरस्सर नसतात. बिबटे संधीसाधू असतात आणि जे सोपे आहे ते करतात.
बचावासाठी जनावरांचा गोठा बंदिस्त आणि तिथे लाईटची व्यवस्था पाहिजे. बिबट्याची उजेडात हल्ल्याची शक्यता कमी असते.
शेतात रात्री जाताना हातात काठी किंवा कुऱ्हाड ठेवावी. शिवाय, टॉर्च सोबत ठेवून मोठ्याने गाणी गावी, किंवा आवाज करावा.