मुळात हॉटेल रुम बुक का करतो? घड्याळ नसण्यामागे आहे सायकॉलॉजिकल कारण...
तुम्ही पाहिले असेल, जेव्हा तुम्ही हॉटेल रुममध्ये जाता तेव्हा तिथे सर्व काही पांढरे असते.
बेडशीट पांढरी, उशी पांढरी, टॉवेलही पांढरे... याच रुममध्ये आणखी एक बदल पाहिला का...
हॉटेलच्या रुममधील भिंतीवर घड्याळ लावलेले नसते. ते का बरे...
तुम्ही पाहिलात तर सर्व पब्लिक प्लेसवर वेळ पाहण्यासाठी घड्याळ लावलेले नसते.
यामागे मनोवैज्ञानिक कारण आहे, सोबत व्यवसायाशी संबंधीत कारणेदेखील आहेत.
मुळात हॉटेल रुम बुक का करतो? विश्रांती, शांतता अनुभवण्यासाठी.
यामुळे गेस्ट जर सारखे सारखे घड्याळ पाहत राहिला तर त्याला स्ट्रेस येतो व तो रिलॅक्स होत नाही.
घड्याळ नसलेल्या रुममध्ये गेस्ट जास्त निवांतपणा अनुभवतो. तसेच आपल्या मनाप्रमाणे वेळ घालवितो.
यामुळे ते हॉटेलची सर्व्हिस जास्त वापरतात, जास्त खर्च करतात. ज्याचा फायदा हॉटेल व्यवसायला होतो.
काही लोकांना घडाळ्याची टिक-टिक त्रस्त करते. रात्री झोपताना हा आवाज जास्त येतो. यामुळे नीट झोप लागत नाही.
हॉटेल्सचे इंटिरिअर अनेकदा घडाळ्याला सुट करत नाही, यामुळे देखील हॉटेल ते टाळतात.
मोठमोठ्या हॉटेलांत आंतरराष्ट्रीय पाहुणे येतात, त्यामुळे त्यांचे वेगवेगळे टाईम झोन असतात. यामुळे त्यांचा गोंधळ उडू शकतो.
घडाळ्याचा सेल बदलणे, वेळ ठीक करणे आदीमध्ये जास्त मेंटेनन्स करावा लागतो, यामुळे देखील टाळले जाते.