जाणून घ्या रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचे कारण...
शरीरात रक्त गोठणे ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रक्त गोठण्यास सुरुवात होते.
हृदयात रक्त गोठण्यामुळे हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हृदयात रक्त गोठण्याची स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. ही समस्या फार कमी लोकांमध्ये दिसून येते.
हृदयात रक्ताची गुठळी झाली तर हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि यामुळेच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
शरिरासाठी अयोग्य अन्न आणि खराब जीवनशैली ही रक्त गोठण्याची सर्वात मोठी कारणे आहेत.
तेलकट, जंक फूड आणि गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर चरबी जमा होऊ लागते.
एवढेच नाही तर धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्त जाड होते, ज्यामुळे रक्तात सहजपणे गुठळ्या तयार होतात.
बराच वेळ बसून काम करणे किंवा शरीर सक्रिय न ठेवणे यामुळे रक्ताभिसरण मंदावते. यामुळेही गुठळ्या तयार होऊ शकतात.
वेळेवर त्याची लक्षणे ओळखणे आणि डॉक्टरांची मदत घेणे महत्वाचे आहे.
केवळ निरोगी आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि तणावापासून दूर राहिल्यानेच हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकते.