टेस्लाच्या कार टॅक्सी म्हणून का वापरतात?

भारतात ६० लाखांना विकणारी टेस्ला बाहेर टॅक्सी म्हणून वापरली जातेय

अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या पहिल्या कार शोरूमचे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

टेस्ला कंपनीने त्यांचा कारखाना सुरु करण्याऐवजी पहिले शोरुम मुंबईत सुरु केलं. टेस्लाने भारतात टेस्ला मॉडेल Y हे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच केले ज्याची किंमत ६० लाख आहे.

पण जगातील ८ देशांमध्ये टेस्लाच्या कार या टॅक्सी म्हणून वापरल्या जातात आणि त्यांची किंमतही कितीतरी लाखोंमध्ये आहे.

दुबईमध्ये २०१७ पासून टेस्लाचे S आणि X मॉडेल टॅक्सी सेवेसाठी वापरायला सुरुवात झाली. दुबईने पर्यावरणपूरक टॅक्सी म्हणून याचा वापर सुरु केला.

न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिससारख्या शहरांमध्येही टेस्ला मॉडेल ३ आणि Y मॉडेल यांचा वापर उबर आणि लिफ्ट सारख्या सेवांमध्ये टॅक्सी म्हणून केला जातो.

नॉर्वेतील ओस्लो, स्विडनमधील स्टॉकहोम आणि गोटेनबर्ग यासह लंडन, जपान आणि कॅनडातील शहरांमध्येही टेस्ला टॅक्सी म्हणून वापरली जाऊ लागली आहे.

टेस्लाच्या कार शून्य उत्सर्जन करतात आणि त्यामुळे प्रदूषण कमी होते. टेस्लाची ऑटोपायलट आणि सेल्फ-ड्रायव्हिंग वैशिष्ट्ये सोयीस्कर आहेत.

ही माहिती सोशल मीडियावरील माहितीवरुन घेतली आहे. यातील काही माहिती पूर्णपणे सत्य नसू शकते, त्यामुळे अधिकृत माहितीसाठी संबंधित वेबसाईटला भेट द्यावी.

Click Here