आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक असे राज्य आहे जिथे इन्कम टॅक्स भरावा लागत नाही?
होय, ते राज्य आहे सिक्कीम!
संविधानाच्या कलम ३७१(एफ) नुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना आयकर भरण्याची गरज नाही.
आयकर कायद्याच्या कलम १०(२६एएए) अंतर्गत त्यांना कर सवलत मिळते.
पगार, व्यवसाय किंवा गुंतवणुकीवरील उत्पन्नावरही त्यांना कर भरावा लागत नाही.
परंतु ही करमाफी सगळ्यांसाठी नाही, त्यासाठी एक अट आहे.
फक्त १९६१ च्या नियमावलीत नोंदणीकृत असलेल्या लोकांनाच ही सवलत मिळते.
म्हणजे, बाहेरून सिक्कीममध्ये स्थायिक झालेल्या लोकांना कर भरावा लागतो.
म्हणूनच, मूळ सिक्कीमचे नागरिक ITR भरण्याच्या टेंशनमधून पूर्णपणे मुक्त आहेत!