रॉयल एनफिल्ड बुलेट ही बाईक अनेकांची आवडती आहे, पण ती कोणती कंपनी बनवते, हे अनेकांना माहीत नसतं.
तुमच्या लाडक्या रॉयल एनफिल्ड बुलेटचे खरे निर्माते आहेत आयशर मोटर्स लिमिटेड आहे.
आयशर मोटर्स ही एक भारतीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, जिचे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे आहे.
या कंपनीच्या मालकीची रॉयल एनफिल्ड आणि आयशर ट्रक्स अँड बसेस हे दोन मोठे ब्रँड्स आहेत.
मूळ रॉयल एनफिल्ड ही एक ब्रिटिश कंपनी होती, पण नंतर ती भारतीय कंपनी आयशर मोटर्सने विकत घेतली.
आज रॉयल एनफिल्ड तिच्या क्लासिक डिझाइन आणि दमदार इंजिनमुळे जगभरात लोकप्रिय आहे.
तुमची लाडकी बुलेट आता 'मेड इन इंडिया' आहे, जी आयशर मोटर्सच्या भारतीय प्लांटमध्ये तयार होते.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बुलेट पहाल, तेव्हा लक्षात ठेवा - ती आयशर मोटर्सने बनवली आहे!