दुबईतील एखादा राजा, सुल्तान किंवा शेख मालक असेल असं वाटतं, पण असं काही नाहीये.
बुर्ज खलिफा इमारतीचं निर्माण २००४ मध्ये सुरू झालं होतं. तर २०१० मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. याची उंची ८२८ मीटर आहे आणि यात एकूण १६३ मजले आहेत.
या गगनचुंबी इमारतीमध्ये ५८ हाय-स्पीड लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. या इमारतीचा वरचा भाग ९५ किलोमीटर दूरूनही दिसतो.
यात ३०४ लक्झरी हॉटेल रूम्स आणि ९०० हाय-एंड अपार्टमेंट्स आहेत. इतकंच नाही तर या इमारतीची बाहेरून सफाई करण्यासाठी ३ महिन्यांचा वेळ लागतो.
बुर्ज खलिफा ही इमारत दुबईतील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी इमार प्रॉपर्टीजनं विकसित केली आहे. या कंपनीचे संस्थापक आणि मालक मोहम्मद अली अलाब्बार आहेत.
ते दुबईतील एक मोठे बिझनेसमन आणि रिअल इस्टेट टायकून आहेत. म्हणजे टेक्निकली बुर्ज खलिफा इमारत त्यांच्याच कंपनीची संपत्ती आहे.