नवीन राज्यसभा खासदार मीनाक्षी जैन काय करतात?

वाचा खासदार मीनाक्षी जैन यांच्याबद्दलची माहिती 

राष्ट्रपती नियुक्ती कोट्यातून प्राध्यापक मीनाक्षी जैन या खासदार बनल्या. राज्यसभेत त्यांची नियुक्ती करण्यात आली.

मीनाक्षी जैन या प्राध्यापक होत्या आणि दिल्ली विद्यापीठाशी सलग्नित गार्गी महाविद्यालयात इतिहास शिकवायच्या.

मीनाक्षी जैन यांनी भारतीय इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि धर्म या विषयावर लेखन केले आहे. त्यांची अने पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

मीनाक्षी जैन यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. २०२० मध्ये त्यांना पद्म देऊन सन्मानित करण्यात आले होते.

जैन यांनी रामा अण्ड अयोध्या, पॅरलल पाथवेज अँण्ड द फ्लाईट ऑफ डिएटीज अॅण्ड रीबर्थ ऑफ टेम्पल्स, सती : अवॅजिकल्स, बाप्तिस्त मिशनरीज अॅण्ड द चेंजिंग कॉलोनियल डिस्कोर्स ही पुस्तके लिहिली आहेत. 

 डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Click Here