बिल क्लिंटन कोण आहेत? जेफ्री एपस्टीन याच्यासोबत त्यांचा संबंध कसा आला ?

बिल क्लिंटन हे अमेरिकेचे ४२ वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी दोन टर्म राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले.

त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेत आर्थिक समृद्धी आली. त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन देखील एक प्रसिद्ध राजकारणी आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे काही फोटो समोर आले आहेत. काही फोटोंमध्ये क्लिंटन स्वीमिंग पूल आणि हॉट टबमध्ये दिसत आहेत.

क्लिंटन यांनी मात्र मागेच सर्व आरोप फेटाळले होते. २०१९ मध्ये त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की, एपस्टाइनने केलेल्या भयानक गुन्ह्यांबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हती.

- बिल क्लिंटनने एपस्टीनच्या खाजगी विमानात अनेक वेळा प्रवास केल्याचे नोंदी दाखवतात. काही रिपोर्ट्सनुसार २० हून अधिक वेळा.

 - क्लिंटन यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की हे प्रवास क्लिंटन फाउंडेशनच्या धर्मादाय कार्यासाठी होते, विशेषतः आफ्रिकेत एड्सविरोधी मोहिमेसाठी.

सामाजिक संबंध - एपस्टीन उच्चभ्रू समाजात फिरत असे आणि त्याचे अनेक राजकारणी, व्यापारी आणि सेलिब्रिटींशी संबंध होते. क्लिंटन त्यातील एक होते.

 एपस्टीनच्या फ्लाइट लॉगमध्ये क्लिंटनचे नाव आढळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

Click Here