आसामची इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.
आसामची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन तिच्या बोल्ड कटेंटमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
अमेरिकेतील ॲडल्ट स्टारबरोबरचा तिचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे ती ॲडल्ट इंडस्ट्रीत जाणार का? अशी चर्चा सुरू आहे.
अर्चिता फुकन बेबीडॉल आर्ची या नावाने आधी लोकप्रिय होती. मात्र आता तिने इन्स्टाग्रामवरील नाव बदलून इश्तारा अमीरा असे ठेवले आहे.
फुकन २०२३ साली चर्चेत आली होती. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या अंधारमय भुतकाळाबाबतची माहिती दिली होती.
जुलै २०२३ मध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये अर्चिता फुकननं म्हटले होते की, ती भारतात सहा वर्षांपासून देहविक्री व्यवसायात अडकली होती.
देहविक्री व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी तिला २५ लाख रुपये मोजावे लागले होते. तेव्हा कुठे तिला स्वातंत्र्य मिळालं.
अर्चिता फुकननं पुढं लिहिलं की, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा त्या अंधारमय जगावर मात करून पुढे आल्याचा आनंद वाटतो.
याच पोस्टमध्ये अर्चिताने काही जवळच्या मित्रांचा आणि स्वयंसेवी संस्थांचाही उल्लेख केला.
अर्चिता फुकनच्या अमिरा इश्तारा या नव्या इन्स्टाग्राम हँडलवर १३ लाख फॉलोअर्स आहेत.