इजिप्तमधील पिरॅमिड कोणी आणि कसे बांधले?

आधुनिक यंत्रसामग्री नसताना भव्य पिरॅमिडची निर्मिती अशक्यप्राय गोष्ट होती.

इजिप्त म्हटले की, डोळ्यांसमोर भव्य पिरॅमिड्स उभे राहतात. या पिरॅमिड्सच्या निर्मितीबद्दल कुतूहल आणि भरपूर प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. 

साडेचार हजार वर्षांपूर्वी तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही दोन टन वजनापेक्षा अधिक वजनाचे दगड एकावर एक ठेवून हे पिरॅमिड्स उभारण्यात आले आहेत. 

संशोधकांचा असा अंदाज आहे की, गिझाच्या पिरॅमिड्समध्ये चौकोनी आकाराचे २.३ दशलक्ष मोठे दगड आहेत. त्यातील प्रत्येक दगडाचे वजन सरासरी २.३ मेट्रिक टन आहे.

काहींना वाटते की, अशी भव्य-दिव्य वास्तू निर्माण करणे मानवाच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामागे कदाचित परग्रहावर राहणाऱ्या एलियन्सचा हात असावा. 

मात्र, अभ्यासातून एक नवी माहिती समोर आली आहे. नाईल नदीमुळेच इजिप्तमधील या भव्य-दिव्य पिरॅमिड्सची रचना करणे शक्य झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

नदीच्या एका शाखेचा प्रवाह पिरॅमिड्स असलेल्या भागाच्या जवळून वाहत होता. या प्रवाहाचा वापर मोठ्या दगडांच्या वाहतुकीसाठी करण्यात आला, असे मत संशोधकांचा अंदाज आहे. 

या नदीच्या प्रवाहाचा उपयोग करुन मोठे दगड एकावर एक रचून हे भव्य पिरॅमिड्स उभारले असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. 

पिरॅमिड्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याआधी ती कागदावर उतरवली गेली असावी. त्यासाठीही गणित आणि प्रगत स्थापत्यशास्त्राची समज आवश्यक होती. 

गिझाच्या पिरॅमिडच्या प्रत्येक बाजूला ५२ अंशाचा एक अचूक कोन आहे. पिरॅमिडची रचना करणारे लोक या शास्त्रामध्ये किती पारंगत होते, हे समजण्यासाठी हा एक दाखला पुरेसा आहे. 

Click Here