भारतीय रेल्वेमधील अनेक गाड्या त्यांच्या वेग आणि सोयीसाठी ओळखल्या जातात.
यापैकी एक म्हणजे वंदे भारत. पण एक अशीही ट्रेन आहे जी "भारतीय रेल्वेची किंग" म्हणून ओळखली जाते.
ही ट्रेन केवळ तिच्या वेगासाठीच प्रसिद्ध नाही तर तिच्या वेळेसाठी आणि प्रीमियम सेवांसाठी देखील ओळखली जाते.
ही ट्रेन दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय रेल्वेची किंग म्हणून ओळखली जाणारी राजधानी एक्सप्रेस आहे.
राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रीमियम आणि प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे, जी देशातील व्हीआयपी ट्रेन मानली जाते.
या गाड्या देशाची राजधानी दिल्लीला प्रमुख महानगरे आणि राज्यांच्या राजधान्यांशी हाय-स्पीड मार्गांनी जोडतात.
राजधानी एक्सप्रेस तिच्या वक्तशीरपणासाठी ओळखली जाते आणि हेच तिला इतर गाड्यांपेक्षा वेगळे बनवते.
राजधानीतील प्रवाशांना प्रथम श्रेणीचा आराम, जेवण, चांगली सुरक्षा आणि वातानुकूलित कोच यासारख्या प्रीमियम सुविधा मिळतात.