GST मध्ये बदल झाल्यानंतर सामान्यांना कसा मिळणार दिलासा?
सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार एक मोठे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. सरकार जीएसटी दरांमध्ये मोठी कपात करू शकते.
या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन वापराच्या वस्तू खूपच स्वस्त होतील. सरकारला मध्यमवर्गीय आणि निम्न वर्गीय कुटुंबांसाठी आवश्यक वस्तूंवरील कर कमी करायचा आहे.
सामान्य कुटुंबांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या १२% सेवा व वस्तू कर असलेल्या वस्तूंवर जीएसटी कमी करण्याची सरकारची योजना आहे.
सरकार १२% जीएसटी स्लॅबमध्ये ठेवलेल्या बहुतेक वस्तू ५% स्लॅबमध्ये हस्तांतरित करु शकते किंवा १२% स्लॅब पूर्णपणे रद्द केला जाऊ शकतो.
जर असे झाले तर सामान्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र कोणत्या गोष्टींमध्ये ही सूट मिळणार?
पनीर, तूप, लोणी, प्रक्रिया केलेले अन्न, फळांचे रस, सुकामेवा आणि काजू, जॅम, जेली, चटणी, पॅक केलेले नारळ पाणी, छत्री, शिलाई मशीन
प्रेशर कुकर, इस्त्री, गीझर, लहान वॉशिंग मशीन, स्टेशनरी वस्तू, शेती अवजारे, कापूस, लाकूड, दगड, संगमरवरी आणि धातूच्या शिल्पे