भारतीय आहारात तुपाचे महत्त्व खूप आहे. चपातीला लावण्यासाठी असो किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी, तूप हा अविभाज्य घटक आहे.
गायीचे तूप आणि म्हशीचे तूप यापैकी कोणते आरोग्यासाठी अधिक चांगले आणि कशात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते, हा प्रश्न अनेकांना पडतो.
रंग आणि पोत: गायीचे तूप पिवळसर रंगाचे असते आणि त्याचा पोत हलका असतो. तर म्हशीचे तूप पांढरे, घट्ट आणि अधिक क्रीमयुक्त असते.
म्हशीच्या तुपात फॅटचे प्रमाण (साधारण ७-८%) जास्त असते, तर गायीच्या तुपात ते (साधारण ३-४%) कमी असते. यामुळे म्हशीच्या तुपात कॅलरी जास्त असतात.
पण म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या तुपात गायीच्या तुपाच्या तुलनेत कोलेस्टेरॉलचे प्रमाण किंचित कमी असते.
गायीचे तूप पचनास हलके असते, त्यामुळे ते लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी अधिक उपयुक्त मानले जाते. म्हशीचे तूप जड असल्याने पचायला वेळ लागतो.
गायीच्या तुपात व्हिटॅमिन ए (A), डी (D), ई (E) आणि के (K) अधिक प्रमाणात आढळतात. तर म्हशीच्या तुपात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी गायीचे तूप चांगले मानले जाते, कारण त्यात फॅट कमी असते. ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा खूप शारीरिक श्रम करतात, त्यांच्यासाठी म्हशीचे तूप अधिक ऊर्जा आणि ताकद देते.