दूधसागर धबधबा प्रसिद्ध आहे. पण, तो काहीवेळा पर्यटकांसाठी बंद असतो.
तुम्ही 'चेन्नई एक्सप्रेस' शाहरुख खान आणि दिपीका पदुकोन यांचा चित्रपट पाहिला असेल.
या चेन्नई एक्सप्रेस चित्रपटात दाखवण्यात आलेला हा धबधबा गोव्यातील आहे.
दूधसागर धबधबा इतका सुंदर आहे की, तब्बल ३२० मीटर उंचावरून येथे पाणी खाली कोसळतं.
भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये हा धबधबा पाचव्या क्रमांकावर येतो. गोव्यातील मांडोवी नदीवर हा विशाल धबधबा आहे.
दूधगंगा धबधबा गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. पर्यटक येथे फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जाऊ शकतात.
या धबधब्याकडे जाताना संपूर्ण जंगलातून वाट काढावी लागते. घटनदाट जंगलातून येथे पोहचण्यासाठी येथे जीप उपलब्ध आहेत.
ट्रेनने जाताना कॅसलरॉक स्टेशन लागते, तिथून थोडे पुढे दूधसागर धबधबा आहे.