दंडोबा डोंगराने जणू हिरवाईचा शालू नेसला आहे.
मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवरील दंडोबा डोंगराने जणू हिरवाईचा शालू नेसला आहे.
डोंगरावर हिरवाई पसरली आहे. पर्यटकांची वर्दळ सुरू झाली असून ट्रेकिंग, पर्यटनासाठी सर्वांना भुरळ घालणारा हा परिसर लक्षवेधी ठरतोय.
पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेला दंडोबा डोंगर 1150 हेक्टरवर पसरला आहे. डोंगरावर अनेक विविध पक्षी, प्राणी आढळतात. डोंगरावर दंडनाथाचे मंदिर आहे.
डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. या ऐतिहासिक डोंगरावर सुमारे दोनशे वर्षांपूर्वीपासून असलेले शिखर ही दंडोबाची ओळख आहे.
पाच गावच्या हद्दीत दंडनाथाचे मंदिर डोंगराचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिरात प्राचीन गुंफा आहे. श्रावणाच्या तिसर्या, चौथ्या सोमवारी यात्रा भरते.
विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या दंडोबावर ट्रेकिंग करण्यासाठी संधी असून अनेकवेळा ट्रेकिंगसाठी येथे तरुण गर्दी करत आहेत.
सांगली ते खरशिंग फाटा ते दंडोबा डोंगर – 40 कि.मी. (रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग), मिरज ते खरशिंग फाटा ते दंडोबा डोंगर – 30 कि.मी.
कुटुंबीयांसह एक दिवसाचे भ्रमंतीचे ठिकाण म्हणजे दंडोबा डोंगर. तर ट्रेकिंगची वेगळीच अनुभूती देणारा दंडोबा डोंगर ठरू लागला आहे.