भारतात इतके सोने येते कुठून? माहितीये का?

भारत किती सोने कोणत्या देशातून आयात करतो?

भारतीय लोकांना सोनं जितकं प्रिय आहे, तेवढं जगात इतरत्र क्वचितच कोणाला प्रिय असेल. त्यामुळेच भारत सरकारही विविध देशांकडून सोनं आयात करीत असतं. 

त्यात सर्वाधिक मोठा वाटा स्वीत्झर्लंडचा आहे. एकूण आयातीपैकी तब्बल ३६ टक्के सोनं आपण स्वीत्झर्लंडकडून खरेदी करतो.

दक्षिण आफ्रिकेकडून सोन्याच्या आयातीचं प्रमाण दहा टक्के, तर संयुक्त अरब अमिरातीकडून नऊ टक्के इतकं आहे. 

२०२२-२३मध्ये भारतानं एकूण ३५ अब्ज डॉलर्स किंमतीचं सोनं आयात केलं होतं. त्यात २०२३-२४ मध्ये वाढ झाली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारताने २०२३-२४ या वर्षात तब्बल ४८ देशातून सोन्याची आयात केली.

भारताने बोलिव्हिया देशातून ७ टक्के, तर अमेरिकेतून ५ टक्के सोन्याची आयात केली. त्याचबरोबर पेरू आणि गिनिआ या देशातून प्रत्येकी ५ टक्के सोनं आयात केलं गेलं.

फायनान्स व्हाईबच्या माहितीनुसार, घाना या देशातून ४ टक्के, तर ऑस्ट्रेलियातून ३ टक्के सोन्याची आयात केली गेली.

Click Here