WhatsApp ने नुकतेच नवे फीचर सुरू केला आहे, त्यामुळे स्कॅमर आपली फसवणूक करू शकतात.
WhatsApp ने नुकताच स्क्रीन शेयरिंग/मिररिंग फीचर सुरू केला आहे, त्यामुळे स्कॅमर आपली फसवणूक करू शकतात.
हे स्कॅमर बँक, आधार किंवा इतर सरकारी एजन्सीच्या नावाने आपल्याला कॉल करतात आणि विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात.
ते WhatsApp वर व्हिडिओ कॉल करतात आणि आपल्याला स्क्रीन शेयर करण्याची विनंती करतात, पण या फीचरविषयी स्पष्ट माहिती देत नाहीत.
आपल्याकडून स्क्रीन शेयरिंगची परमिशन मिळाल्यावर, स्कॅमर आपल्या फोनमधील सर्व माहिती पाहू शकतात.
तुम्ही बँकिंग अॅप उघडल्यास, स्कॅमरला तुमचे पासवर्ड किंवा यूजरनेम सहजपणे कळू शकते.
त्यानंतर, हा स्कॅमर तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.
काही वेळा, हे लोक आपल्याला थर्ड पार्टी अॅप इंस्टॉल करण्यास भाग पडू शकतात, जेणेकरून अधिक डेटा मिळवता येईल.
त्यामुळे, अनोळखी व्यक्तीला कधीही स्क्रीन शेयर करू नका आणि थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करताना विशेष काळजी घ्या.