WhatsApp च्या या फिचरने चुकणार नाहीत महत्त्वाचे मेसेज
महत्त्वाचे मेसेज वाचायला विसरलात तर काळजी करु नका
व्हॉट्सअॅप आता फक्त प्रकरण 'गुड मॉर्निंग'च्या पलीकडे जाऊन कामाशी संबंधित गोष्टींपर्यंत पोहोचले आहे. ऑफिसपासून ते व्यवसायापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी बोलल्या जातात.
व्हॉट्सअॅपवर मेसेजेस भरपूर येतात. याच्यामुळेच आपण एखाद्या महत्त्वाच्या मेसेजला उत्तर द्यायला विसरतो आणि महत्त्वाचा मेसेज खाली ढकलला जातो.
व्हॉट्सअॅपने यासाठी'रिमाइंड मी' फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना महत्त्वाचे मेसेज लक्षात ठेवणे सोपे होईल.
व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरची चाचणी करत आहे ज्यामुळे युजर्स मेसेजचे रिमाइंडर पाठवू शकतील.
रिमाइंड मी फीचर बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. या फीचरच्या मदतीने, युजर्स मेसेजवर क्लिक करुन ठेवताच रिमाइंड मी पॉपअप स्क्रीनवर दिसेल.
युजरला २ तास, ८ तास आणि २४ तासांत रिमाइंडरचा पर्याय मिळेल. युजरला त्याच्या इच्छेनुसार रिमाइंडर सेट करण्याचा पर्याय देखील मिळेल.
रिमाइंडर सेट होताच, अॅपच्या स्क्रीनवर एक बेल आयकॉन दिसू लागेल. तुम्ही ठरवलेल्या वेळी तुम्हाला त्या मेसेजचा रिमाइंडर मिळेल. त
रिमाइंड मी फीचर फक्त एका मेसेजसाठी काम करेल की अनेक मेसेजसाठीही हे अद्याप स्पष्ट नाही. हे फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन २.२५.२१.१४ मध्ये आहे.